


देसूर : येथील प्राथमिक मराठी शाळेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शताब्दी महोत्सवाचे नियोजन, कार्यक्रमाचे स्वरूप आणि आयोजनासंदर्भातील विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.
शाळेने शंभर वर्षांच्या प्रवासात अनेक विद्यार्थी घडविले असून, शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून शाळेच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. महोत्सव यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.
या बैठकीत महोत्सवाच्या पुढील नियोजनाबाबत चर्चा करून आयोजनासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta