


हिरेबुदनूर : बैलहोंगल तालुका हिरेबुदनूर गावातील श्री बाळू मामा मंदिरामध्ये श्री बाळू मामांचा १३४ वा पाळणा उत्सव कार्यक्रम हिरेबुदनूर श्री बाळू मामा मंदिरामध्ये उद्या शुक्रवार दि. २३ रोजी साजरा करण्यात येणार असून, त्या दिवशी सकाळी भक्त मंडळासोबत देवाची विशेष पूजा, महारुद्राभिषेक, मंत्र पठण, सहस्र बिल्वार्चन, महाआरती, नैवेद्य, तीर्थप्रसाद वितरण, ढोलाचा वाजंत्री, भजन, श्री पंढरपूर संतांचा मेळा भजन, विविध धार्मिक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडतील.
त्या दिवशी सायंकाळी ४ वाजून २३ मिनिटांनी श्री बाळू मामांचा १३४ वा पाळणा उत्सव कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडेल. सर्व भक्त मंडळींनी या पुण्यक्षेत्राच्या पवित्र जत्रा महोत्सवामध्ये सहभागी होऊन महाप्रसादाचा स्वीकार करून पुण्यवान व्हावे, अशी विनंती करण्यात येत आहे. असे आवाहन नागराज देसाई वन्नूर – अध्यक्ष, वीरप्पा ब. उन्नी- उपाध्यक्ष, रायाप्पा एलप्पा हुणसिकट्टी – कार्यदर्शी, तसेच सर्व सदस्य ,श्री बाळू मामा मंदिर ट्रस्ट, हिरेबुदनूर, तालुका बैलहोंगल, जिल्हा बेळगाव, कर्नाटक राज्य. यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta