Sunday , September 20 2026
Breaking News

पत्रकार दिनी कु. अवनी अर्जुन जाधवचा “कला रत्न” पुरस्कार देऊन सन्मानित

Spread the love

 

ठाणे : सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्ताने पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि करण्यासाठी आपल्या हातांना बळ देऊ पाहणारया पत्रकार, साहित्यिक, कलावंत, खेळाडू यांच्या अनेक पत्रकार संघ, संस्था, संघटना, महापालिका आणि महाराष्ट्र सरकार पुरस्कार देऊन सन्मानित करत असते. ठाणे शहरातील ‘ठाणे नवादूत’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून संपादक दिनेश जोशी हे दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, कार्य करणाऱ्या कलागुणांचा सन्मान करत असतात. कु. अवनी अर्जुन जाधव हिला “कला रत्न” पुरस्कार देऊन पत्रकार दिनी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कु. अवनी अर्जुन जाधव हिने अनेक महापुरुषांची रेखाचित्र आपल्या प्रतिभा शक्तीच्या कलाकृतीतून रेखाटलेली आहे. तिच्या रेखाचित्राना पारितोषिके ही मिळालेली असून मुंबई येथील प्रसिद्ध जहांगिर आर्ट्स येथे भरलेल्या प्रदर्शनात मानाचा सहभाग ही मिळाला होता. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे स्वर्गीय आ. आणि चंदगडी रत्न मा. नरसिंगराव गुरूनाथ पाटील यांचे प्रथम रेखाचित्र रेखाटून तिने कलाक्षेत्रात प्रवेश केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; हुक्केरी तालुक्यातील तिघांना अटक

Spread the love  चंदगड : तिलारी घाटातील प्रेशर पॉईंट परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *