Sunday , September 20 2026
Breaking News

श्रीपेवाडी येथील जी. एम. संकपाळ हायस्कूलला अरिहंत उद्योग समूहातर्फे १ लाखाचा मदत निधी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : श्रीपेवाडी येथील जी. एम. संकपाळ हायस्कूल शिक्षण संस्थेच्या संगणक व कार्यालयीन इमारतीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले होते. या दुर्दैवी घटनेवेळी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी भेट देऊन शाळेस मदतीची जाहीर घोषणा केली होती. त्यानुसार मंगळवारी (ता.६) प्रत्यक्ष वचनपूर्ती करत अरिहंत सभागृहात त्यांच्या हस्ते शाळेच्या संचालक मंडळाकडे १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे शाळेच्या पुनर्बांधणीसह शैक्षणिक कामकाज सुरळीत सुरू होणार आहे.
शैक्षणिक कार्यासाठी लाखाचा धनादेश दिल्याबद्दल हायस्कूलच्या संचालक मंडळातर्फे उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
उत्तम पाटील यांनी, अरिहंत उद्योग समूहातर्फे निरंतरपणे सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. अडचणीच्या वेळी मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपुलकीच्या भावनेतून हा लाखाचा निधी मदतरुपी दिला आहे. त्यासाठी युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. आपत्तीच्या काळात शिक्षण संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुशांत वडगावे, बाबासो कांबळे, संचालक दगडू चेंडके, गजानन शिंदे, मुख्याध्यापक जाधव, एम. बी. कुंभार यांच्यासह संचालक व मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *