



दिवाळीत मोबाईल, टीव्ही, फ्रीज खरेदीकडे कल; अनेक वस्तूंच्या खरेदीवर गिफ्ट
निपाणी (वार्ता) : दिवाळी सणात घराची सजावट, नवीन कपडे आणि फराळाच्या तयारीसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीलाही ग्राहकांकडून पसंती देत आहेत. इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ वेगवेगळ्या ऑफर्सनी भरले असून दीपोत्सव कॅश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन वस्तू घरी आणण्यासाठी ग्राहक टीव्ही, फ्रीज, मोबाईल, वॉशिंग मशिन सारख्या वस्तूंची खरेदीसह बुकिंग करत आहेत.
बदलत्या तंत्रज्ञानामुळे स्मार्ट टीव्ही, मोबाईल, इन्व्हर्टर, मोबाईल, फ्रिज बाजारात उपलब्ध झाले आहेत. शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढत आहे. काही दिवस थोडी शांतता असताना अनेक कुटुंब सणाच्या मुहूर्तावर घरात नवीन उपकरणे खरेदी करत आहेत.
यंदाच्या दिवाळी उत्सवात इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये विविध सवलतीच्या योजना सुरू केल्या आहेत. अनेक कंपन्या आणि विक्रेत्यांकडून ऑफर्स दिल्या आहेत. तर काही उत्पादनांवर सवलत, कॅशबॅक, एक्स्चेंज ऑफर, क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर अतिरिक्त लाभ दिला जात आहे. काही दुकानांमध्ये सुलभ हप्त्यांची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
——————————————————————–
‘दिवाळीतील धनत्रयोदशीपासून लक्ष्मीपूजनापर्यंतच्या काळात नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकांनी खरेदीसाठी या दिवसांचे नियोजन केले आहे. घरातील गरज, बजेट आणि उपलब्ध ऑफर्सचा विचार करून ग्राहक इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निवड करीत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत निर्माण झालेला हा उत्साह विक्रेत्यांसाठीही महत्त्वाचा ठरत आहे. यंदा नागरिकासह युवक युतीमध्ये अत्याधुनिक मोबाईल खरेदीसाठी गर्दी होत आहे.’
–आकाश पाटील, मोबाईल विक्रीते, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta