Friday , November 6 2026
Breaking News

रेशनच्या तांदळाचा काळाबाजार रोखण्यासाठी धडक मोहीम

Spread the love

 

राज्यभरात 17.78 लाख किलो तांदूळ जप्त; बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाच लाख किलो तांदळाचा समावेश

बेळगाव : रेशनवरील तांदळाचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यभर धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत बेकायदेशीर वाहतूक, साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तब्बल 17.78 लाख किलो तांदूळ जप्त करण्यात आला आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील पाच लाख किलोहून अधिक तांदळाचा समावेश असून, राज्यातील जप्तीच्या आकडेवारीत बेळगाव जिल्हा आघाडीवर आहे.

एक ऑगस्टपासून विभागाकडून संशयित वाहनांची तपासणी तसेच खासगी गोदामांवर छापेमारी सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत बेळगाव जिल्ह्यात पाच लाख किलोहून अधिक, कोलार जिल्ह्यात साडेतीन लाख किलो, तर बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यांत प्रत्येकी एक लाख किलोहून अधिक तांदूळ जप्त करण्यात आला आहे.

या धडक मोहिमेदरम्यान एकूण 238 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 215 जणांना अटक करण्यात आली आहे. तस्करीसाठी वापरण्यात येणारी 156 वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय 14 हजार 250 लिटर पेट्रोल आणि 1 हजार 492 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

रेशन कार्डधारकांसाठी शासनाकडून वितरित करण्यात येणारा तांदूळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारात विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. अलीकडच्या काळात तांदळाच्या बाजारभावात वाढ झाल्याने रेशनवरील तांदळाची बेकायदेशीर खरेदी-विक्री करण्याचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा गैरफायदा घेणाऱ्या टोळ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रिजवान हरशद यांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

अनाथाश्रमातील मुलांना नवीन कपड्यांचे वाटप

Spread the love    बेळगाव : दिवाळीच्या मंगलमय सणानिमित्त रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या सदस्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *