Friday , November 6 2026
Breaking News

घराघरातील फराळ चाललाय विदेशात

Spread the love

 

 

आंतरराष्ट्रीय पार्सल दरांत २० टक्क्यांनी घट; शहर, परिसरातून बुकिंगला प्रतिसाद

निपाणी (वार्ता) : दिवाळीत‌ घराघरांत तयार होणारा चिवडा, लाडू, चकली, करंजी, शंकरपाळी अशा अस्सल फराळाची गोडी काही औरच असते. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त परदेशात असलेल्या आपल्या मुला-मुलींसह नातेवाईक आणि मित्रांनाही घरच्या फराळाची चव चाखता यावी, यासाठी शहर आणि परिसरातून पार्सल पाठविण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदा परदेशात फराळ पाठविण्यासाठी भारतीय टपाल विभागासह खासगी कुरियर कंपन्यांकडेही बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरात देशाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा देणाऱ्या १२ पेक्षा अधिक कुरिअर कंपन्यांच्या एजन्सी कार्यरत आहेत. पार्सलचे दर वजनानुसार निश्चित करण्यात आले आहेत. पार्सलचे वजन आणि पार्सल कोणत्या देशात पाठवायचे आहे, यानुसारही दर आहेत. खासगी कुरिअरच्या तुलनेत भारतीय डाक विभागाचे दर काही प्रमाणात कमी असल्याने अनेक ग्राहक पोस्टाच्या सेवेला प्राधान्य देत आहेत.
——————————————————————–
‘दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परदेशात फराळाचे पार्सल पाठविण्यासाठी पोस्ट विभागाकडे नोंदणी वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक बुकिंग होत आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असून, शहरातील मुख्य डाकघर तसेच उपडाकघरांमधून पार्सल बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे.’
–दर्शन उपाध्ये,
पोस्टमास्तर, निपाणी
——————————————————————-
पार्सल जाणारे देश
अमेरिका, सौदी अरेबिया, कतार, युनायटेड किंगडम, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, कॅनडा

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *