


बाळासाहेब जासूद : निपाणीत दुर्गामाता दौडीची सांगता
निपाणी (वार्ता) : युवकांमध्ये समाज आणि देश बदलण्याची ताकद आहे. पण अलीकडचा तरुण दिशाहीन बनल्याने त्यांना मार्गदर्शनची गरज आहे. त्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तरच सध्याची पिढी योग्य पद्धतीने काम करू शकेल. समाज, देश आणि धर्मासाठी युवा मंडळींनी पुढे येण्याचे आवाहन येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी चौक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद यांनी केले. नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित दुर्गामाता दौडीच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
दुर्गामाता दौडीच्या अखेरच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तस पंच नद्याचा जलाअभिषेक सर्व धारकऱ्यांच्या हस्ते पूजन झाले. श्रीमंत राजेशराजे देसाई- निपाणीकर सरकार यांच्या हस्ते शस्त्रपूजन करून ध्येय मंत्राने श्री दुर्गामाता दौडीला प्रारंभ झाल. दौड निपाणकर वाड्यात आल्यावर तुळजाभवानीची आरती करून श्री दुर्गामाता दौड चाटे मार्केट कडे मार्गस्थ झाली. शिवराष्ट्र धर्म संघटनेतर्फे स्वागत झाले. जुना पी. बी. रोडमार्गे दगडी चाळ मध्ये दौड आल्यानंतर तिथे फुलांची उधळण करण्यात आले तिथून अशोक नगरमार्गे कोठीवले कॉर्नरवर आल्यावर ट्रब्लर्ज ग्रुपतर्फे स्वागत करण्यात झाले.
ठीक ठिकाणी रांगोळ्या काढून फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषणे परिसर दुमदुमुन निघाला होता. दौड, दत्त गल्ली, नरवीर तानाजी चौक, जिजामाता चौक, लोणार गल्लीकडून घिसाड गल्लीत आल्यानंतर आरती झाली. दुर्गामाता दौड छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर प्रेरणा मंत्राने दौडीची सांगता झाली.
या वेळी उपास्थित मंडळाचे उपाध्यक्ष संजय माने, खजिनदार नितीन साळुंखे, सेक्रेटरी ओमकार शिंदे, पांडुरंग भोई, ओमकार शिंदे, विनायक वडे, सुनील शेलार, महेश गजरगावे, सतीश शिरगावे, सतीश हसूरे, पौरस भोई, अनुप शिंदे, नितीन नाईक, सुहास हसूरे सह मंडळाचे कार्यकर्ते, युवक, युवती, शिवभक्त उपस्थित होते. आशिष भाट यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta