Friday , October 23 2026
Breaking News

हनुमान को-ऑप. सोसायटीचा कुर्लीमध्ये उद्घाटन सोहळा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कुर्ली येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्री हनुमान को-ऑप.सोसायटीचा उद्घाटन सोहळा आडी येथील दत्त मंदिरांमधील परमाब्धिकार परमात्मराज उर्फ राजीवजी महाराज, कुर्ली येथील राजगिरी मठातील सुदर्शन गिरी महाराज, कुर्ली येथील हालसिद्धनाथ मंदिर मधील पुजारी मुरारी दिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
बोरगाव येथील अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील व सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थिती संस्थेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी संस्थेतर्फे उत्तम पाटील, अभिनंदन पाटील यांच्यासह मान्यवरांचा संस्थेचे संस्थापक अरुण निकाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उत्तम पाटील यांनी, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळावी, सभासदांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि संस्थेच्या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साधली जावी. भविष्यात संस्था सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, दत्तगुरु संस्थेचे अध्यक्ष सचिन खोत, ॲड. दादासाहेब लंबे, के. डी. पाटील, श्रीनिवास पाटील, अजय पाटील, सीताराम चौगुले, शिवाजी चौगुले, विश्वनाथ पाटील, अमर शिंत्रे, लक्ष्मण नेजे, अजित पाटील, नानासो पाटील, प्रदीप निकाडे यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य, सभासद, स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *