Friday , October 23 2026
Breaking News

ऊस दर वाढीसाठी गुर्लापूर येथे २५ ला आंदोलन

Spread the love

 

राजू पोवार;१५ लाख शेतकरी एकत्र येणार

निपाणी (वार्ता) : ऊस दराबाबत बेळगाव येथील विधानसभेमध्ये बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊस दर वाढीसाठी गुर्लापूर येथे २५ ला कर्नाटक राज्य रक्षक संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये १५ लाख शेतकरी एकत्र येणार असून निपाणी तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले. गुर्लापूर येथील शासकीय विश्राम धामात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, येत्या २६ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ऊस दर वाढीसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सरकार आणि साखर कारखानदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी बैठकीच्या आदल्या दिवशी, २५ ऑक्टोबर रोजी गुर्लापूर येथे ऐतिहासिक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात राज्यातून अंदाजे १५ ते २० लाख शेतकरी बांधव हजर राहणार आहेत. हक्काच्या ऊस दरासाठी ही लढाई निर्णायक ठरेल. यासाठी निपाणी तालुक्यातील रयत संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि रयत सैनिकांनी कोणत्याही परिस्थितीत तालुक्यातील प्रत्येक गावातून शेतकऱ्यांनी संघटित होऊन गुर्लापूरकडे कूच करावे,असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, शशिकांत पडसलगी, सत्याप्पा मल्हापुरे, कुमार मरडी, किसन नंदी, प्रकाश नाईक, वासू पंढरोळी, प्रेम चौगुले, मनोहर तेली, मनोज मंगोळी, संजू हावनावर, मल्लापा अंगडी, मंजू पुजारी, गोपाळ कुन्नुर, प्रकाश तारळे, अनिकेत जोमा संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव अरिहंत सौहार्द संस्थेच्या जयसिंगपूर शाखेचा वर्धापन दिन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री.अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., बोरगाव (मल्टिस्टेट), …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *