Friday , October 23 2026
Breaking News

‘बोरगाव स्पोर्ट्स’ युथ स्पोर्ट्स ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य आण्णासाहेब हावले यांच्या सहकार्याने येथे आयोजित युथ स्पोर्ट्स या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बोरगाव येथील बोरगाव स्पोर्ट्स या संघाने रुकडीच्या व्ही. के. स्पोर्ट्स या संघाचा पराभव करत पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. तर रुकडी संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेत ३० संघानी सहभाग घेतला होता. बोरगाव आणि व्ही. के स्पोर्ट्स रुकडी यांच्यात अंतिम सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना बोरगाव संघाने २ गडी बाद ७४ धावा काढल्या. व्ही. के. स्पोर्ट्स रुकडी संघाने ९ गडी बाद ६६ धावा काढल्या. यामध्ये बोरगाव संघ विजेता ठरला तर रुकडी संघ उपविजेता ठरला.
विजेत्या बोरगाव संघास संघास प्रथम क्रमांकाचे ५१ हजार रुपये व चषक, उपविजेत्या रुकडी संघास ३१हजार रुपये चषक, तृतीय क्रमांक परमाने ट्रेडर्स पाचगाव यांना ११ हजार व चषक, चतुर्थ क्रमांक हिंडलगा स्पोर्ट्स क्लब यांना ११ हजार रुपये व पाचव्या क्रमांक गडमुडशिंगी येथील जय भवानी संघ यांना ५ हजार व चषक देण्यात आले. सामनावीर जावेद सनदी व मालिकावीराचा बहुमान राहुल कुडचे यांनी पटकावला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून रुकडी संघाचा संदीप मकवाना व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बोरगाव संघाचा शैलेश जाधव यांना अण्णासाहेब हावले यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
कार्यक्रमास अनुज हवले, नगरसेवक रोहित पाटील, बाळासाहेब बसन्नवर, विद्याधर अम्मान्नावर, संजय हावले, शिवाप्पा माळगे, रावसाहेब तेरदाळे, शितल मगदूम, शरद सातपुते, शिशिर सातपुते, अमर शिरोळे, रुपेश वडर, अनिल इंगळे, रॉय गुरव, राहुल कुडचे, अमर पाटील, दीपक कुडचे, सम्मेद नरवाडे, सादिक जमादार यांच्यासह क्रीडा प्रेमी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘एसआयआर’ प्रक्रिया रद्द करण्यासाठी काँग्रेसतर्फे ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याचे दहन

Spread the love  निपाणी (वार्ता) : ‘एसआयआर’ प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, शिवाय चुकीच्या पद्धतीने वगळण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *