Friday , October 23 2026
Breaking News

म्युनिसिपल हायस्कूलचा फलकच गायब!

Spread the love

 

शाळेला शतकोत्तर वर्षांची परंपरा ; नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शतकोत्तर वर्षांची परंपरा असणाऱ्या लाखो विद्यार्थी घडविणाऱ्या नगरपालिका संचलित म्युनिसिपल हायस्कूल मधील इमारती सहशाळा खोल्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
या इमारतीवर असलेले ‘म्युनिसिपल हायस्कूल’चा फलक स्वातंत्र्य दिनानिमित्त रंग देताना हटविण्यात आला आहे. त्यानंतर आज जागा आहेत महिनाभर ही इमारत फलकाविना तशीच असल्याने संताप व्यक्त होत आहे.
अलीकडच्या काळात या शाळेला संरक्षण भिंत नसल्याने मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनले आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी पथदिप लागत नसल्याने हा परिसर अवैद्य व्यवसायांसह मद्यपींचा अड्डा बनला आहे. याशिवाय चार चाकी वाहनांचे पार्किंगही दिवस रात्र केले जाते. त्यामुळे क्रिकेट खेळाडूसाठी असलेली एकमेव मैदान समस्यांच्या गर्तेत सापडले आहे.
सध्या इमारती वरील नाम फलकच गायब झाला आहे. यासंदर्भात संबंधित मुख्याध्यापकांशी नागरिकांनी संपर्क साधला असता नगरपालिकेला नामफलकाबाबत पत्र दिल्याचे सांगितले जात आहे.
——————————————————————-
‘स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इमारतीला रंग देताना फलक काढला गेला आहे. याबाबत बऱ्याचदा नगरपालिका प्रशासनासह शाळा प्रमुखांना सांगूनही त्यांनी केले आहे. तात्काळ फलक न बसविल्यास आंदोलन करण्यात येईल.’
-मज्जिद सय्यद, माजी नगरसेवक, निपाणी
—
‘स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हायस्कूलच्या इमारतीला रंग देताना नाव पुसले गेले आहे. याबाबत नागरिकांनी ही सूचना केली आहे. आठवडाभरात हायस्कूल इमारतीवर ‘म्युनिसिपल हायस्कूल’असे फलक लिहिले जाईल.’
–गणपती पाटील, नगरपालिका आयुक्त, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

ऊस दर वाढीसाठी गुर्लापूर येथे २५ ला आंदोलन

Spread the love  राजू पोवार;१५ लाख शेतकरी एकत्र येणार निपाणी (वार्ता) : ऊस दराबाबत बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *