


बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित भाऊराव काकतकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. आरती गोरल हिने महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या महाविद्यालयीन स्वरचित काव्यवाचन स्पर्धेमध्ये कु. वैष्णवी शिंदे हिने द्वितीय क्रमांक मिळवला त्यासोबत कु. शिवानी मलतवाडकर हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. विद्या प्रसारक मंडळ संचलित डॉ. घाळी महाविद्यालय, गडहिंग्लज यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या रत्नमाला घाळी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेमध्ये कु. ऋतुजा केसरकर हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. तसेच विविध स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. शिंदे सर यांचे मार्गहानि लाभले. मराठी विभाग प्रमुख प्रा. कविता पाटील आणि प्रा. संतोष मादाकाचे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन लाभले.

Belgaum Varta Belgaum Varta