Saturday , October 24 2026
Breaking News

अनिल अंबरोळे यांची भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या आयोजन सचिवपदी निवड; रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते सत्कार

Spread the love

 

बेळगाव : बेळगावच्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे श्री. अनिल अंबरोळे यांची भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या आयोजन सचिव (वर्किंग सेक्रेटरी) पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठा समाजाचे नेते रमाकांत दादा कोंडुसकर यांच्या कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात कोंडुसकर यांच्या हस्ते अनिल अंबरोळे यांचा सन्मान करण्यात आला.

या निवडीमुळे बेळगावच्या बॉडी बिल्डिंग क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अंबरोळे यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याबद्दल उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी युवा कार्यकर्ते सागर पाटील, युवा नेते प्रशांत भातकांडे, सूरज चव्हाण, दर्शन हदगल, राजेंद्र बैलूर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी अनिल अंबरोळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

वेदांत फाउंडेशनतर्फे गवळीवाडा गाव दत्तक

Spread the love  ग्रामविकास प्रकल्पाचा शुभारंभ; शिक्षण, सामाजिक उपक्रमांतून गावाचा कायापालट करण्याचा संकल्प खानापूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *