


निपाणी (वार्ता) : मानकापूर (ता.निपाणी) येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरासाठी दिवंगत सहकाररत्न रावसाहेब (दादा) पाटील यांच्या स्मरणार्थ मीनाक्षीआई रावसाहेब पाटील यांच्याकडून देणगी देण्यात आली. सदर देणगीची रक्कम मंदिर कमिटीच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आली.
धार्मिक स्थळांच्या विकासासह समाजातील धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा जतन करण्यासाठी देण्यात आलेले हे योगदान महत्त्वपूर्ण आहे. दादांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या उपक्रमातून मंदिराच्या कार्यासाठी सहकार्य करण्यात आले. रावसाहेब (दादा) पाटील यांनी आपल्या सामाजिक कार्यातून समाजात निर्माण केलेला आदर्श आणि सेवाभावी वारसा आजही जपला जात असूनत्यांचे हेच समाजहिताचे कार्य श्रीमती मीनाक्षीआई पाटील यांच्या माध्यमातून अविरतपणे पुढे सुरू असल्याचे मानकापूर येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, मंदिर कमिटीचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta