


बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी, बेळगाव येथील युवा समितीच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे.
येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. काळ्या दिनाच्या नियोजनासह जनजागृती आणि पुढील कार्यवाहीबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta