Saturday , October 24 2026
Breaking News

बँकांना सलग तीन दिवस टाळे!

Spread the love

 

 

चौथा शनिवार, रविवार आणि वाल्मिकी जयंतीमुळे बँका बंद; रोख व्यवहारांसाठी नागरिकांना करावे लागणार नियोजन

बेळगाव : दसरोत्सवाची धामधूम संपताच बँकांना सलग तीन दिवस सुट्ट्या येणार आहेत. चौथा शनिवार, रविवार आणि सोमवारी वाल्मिकी जयंतीनिमित्त बँकांचे कामकाज बंद राहणार असल्याने शनिवार, २४ ऑक्टोबर ते सोमवार, २६ ऑक्टोबरदरम्यान नागरिकांना बँकेच्या शाखांमध्ये प्रत्यक्ष व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे धनादेश वटविणे, रोख रक्कम जमा करणे आणि अन्य बँकिंग कामांसाठी नागरिकांना मंगळवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दसरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून बँकांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली होती. वाहन आणि घरखरेदी, सोन्याची खरेदी तसेच विविध कर्जांसाठी नागरिकांनी बँकांकडे धाव घेतली होती. सणानिमित्त बँकांनी जाहीर केलेल्या विविध योजनांचाही ग्राहकांनी लाभ घेतला. त्यामुळे आर्थिक व्यवहारांना वेग आला होता.

आता सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने रोख रकमेची आवश्यकता असलेल्या नागरिकांनी आधीच नियोजन करणे आवश्यक आहे. एटीएम आणि ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहणार असल्या, तरी सर्व प्रकारचे व्यवहार डिजिटल माध्यमातून करणे शक्य नसते. त्यामुळे बँकेच्या शाखेत जाऊन कामे पूर्ण करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मंगळवार, २७ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

डॉ. दिनकर मष्णू साळुंखे यांची मण्णूर येथील जय जण कल्याण सौहार्द सहकारी संघाला सदिच्छा भेट

Spread the love  बेळगाव : डॉ. दिनकर मष्णू साळुंखे हे भारतातील एक नामवंत जीवशास्त्रज्ञ (Biologist) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *