Saturday , October 24 2026
Breaking News

चायनीज मांजाविरोधात बेळगाव पोलिसांची व्यापक मोहीम; विक्री केंद्रांसह पतंग उडविण्याच्या ठिकाणी छापे

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहरात चायनीज मांजामुळे होणाऱ्या जीवघेण्या दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. शहरातील सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी मांजा विक्रीची दुकाने, विक्री केंद्रे तसेच पतंग उडविण्याच्या ठिकाणी छापे टाकून तपासणी केली. या कारवाईदरम्यान मांजा आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.

चायनीज मांजाच्या वापरामुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि पक्ष्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वी गांधीनगर पुलावर चायनीज मांजामुळे दुचाकीस्वार ध्रुव करंजी यांचा गळा कापला जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि शहरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, या उद्देशाने पोलिसांकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

शहरात चायनीज मांजाची विक्री, साठवणूक किंवा वापर होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच पालकांनी मुलांना पतंग उडवताना योग्य ती खबरदारी घेण्यास सांगावे आणि धोकादायक मांजाचा वापर टाळावा.

नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य

मानून पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

अनिल अंबरोळे यांची भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या आयोजन सचिवपदी निवड; रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते सत्कार

Spread the love  बेळगाव : बेळगावच्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे श्री. अनिल अंबरोळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *