Saturday , October 24 2026
Breaking News

डॉ. दिनकर मष्णू साळुंखे यांची मण्णूर येथील जय जण कल्याण सौहार्द सहकारी संघाला सदिच्छा भेट

Spread the love

 

बेळगाव : डॉ. दिनकर मष्णू साळुंखे हे भारतातील एक नामवंत जीवशास्त्रज्ञ (Biologist) आणि इम्युनोलॉजिस्ट (Immunologist) आहेत. स्ट्रक्चरल बायोलॉजी आणि रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित संशोधनात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे
ICGEB चे संचालक: डॉ. साळुंखे यांनी नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB) चे संचालक म्हणून काम पाहिले आहे
RCB चे कार्यकारी संचालक: यापूर्वी त्यांनी फरीदाबाद येथील ‘प्रादेशिक जैवतंत्रज्ञान केंद्र’ (Regional Centre for Biotechnology – RCB) चे पहिले कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. हे केंद्र भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग आणि युनेस्को (UNESCO) यांनी संयुक्तपणे स्थापन केले.
असे नामवंत ख्यातीचे शास्त्रज्ञ असलेले डॉ. दिनकर साळुंखे यांचा जन्म बेळगाव येथील हिंडलगा येथे झाला तसेच त्यांचे शिक्षण सुद्धा बेळगाव येथेच झाले. ते आपल्या काही कामानिमित्त हिंडलगा येथे आले असता त्यांची भेट आपल्या संस्थेला झाली. आमच्या संस्थेचे संस्थापक श्री. एल. के. कालकुंद्री यांचे ते वर्गमित्र होत त्यामुळॆ त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी मण्णूर गावाला भेट दिली. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक श्री. एल के कालकुंद्री, चेअरमन लक्ष्मण मंडोळकर, व्हा. चेअरमन संदीप कदम, संचालक विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी, बसवंत नाईक तसेच नारायण कालकुंद्री, टी के मंडोळकर, प्रकाश बेळगुंदकर सर व संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते. त्यांचा या प्रसंगी संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

अनिल अंबरोळे यांची भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या आयोजन सचिवपदी निवड; रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते सत्कार

Spread the love  बेळगाव : बेळगावच्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे श्री. अनिल अंबरोळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *