Saturday , October 24 2026
Breaking News

मास्क ग्रुपच्या सेवेचे वटवृक्षात रूपांतर

Spread the love

 

सुहासिनी दोशी ; महावीर सेवार्थ दवाखान्यात अत्याधुनिक मशनरीचे उद्घाटन

निपाणी (वार्ता) : डॉ. वैशाली व डॉ. विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघातर्फे सुरू केलेल्या सेवार्थ दवाखाना आता अत्याधुनिक बनला आहे. सर्वसामान्य रुग्णांना अत्यंत माफक दरात येथे सेवा दिली जात आहे. या दवाखान्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले असून. नवनवीन येणाऱ्या मशनरी चा उपयोग करून घेऊन नागरिकांनी आरोग्य सेवा घ्यावी. मधुमेहावर अत्यंत उपयुक्त अशी यंत्रणा या ठिकाणी सुरू झाली आहे. मशिनी द्वारे माहिती व अहवाल उपलब्ध झाले आहे. या सेवेचा रुग्णांनी लाभ घेऊन आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे आवाहन माजी नगरसेविका सुहासिनीभाभी दोशी यांनी केले.
येथील महावीर सेवार्थ आरोग्य केंद्रात एचबीएवनसी मधुमेहावरील या अत्याधुनिक आणि बेळगाव जिल्ह्यात प्रथमच दाखल झालेल्या मशिनरीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
डॉ. पंकज देशमाने म्हणाले, नव्याने आलेली मशिनरी मधुमेहर रुग्णासाठी वरदान ठरणार आहे. अत्यंत कमी खर्चात ही सुविधा मास्क ग्रुपने उपलब्ध केली आहे. नवीन तंत्रज्ञानाद्वारे तपासणीचा अहवाल मिळणार आहे. समाजातील गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शहा यांनी, या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक लॅब्रॉटरी उपलब्ध आहे. त्याद्वारे चांगली सुविधा रुग्णांना दिली जात आहे. दवाखान्याच्या स्थापनेपासून आज लागत ७ हजारावर रुग्णांना याचा लाभ झालेला आहे. या पुढील काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मशनरी आणून रुग्णसेवा केली जाणार आहे. लवकरच ग्रुप तर्फे वृद्धाश्रम आणि अन्नदान छत्र उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी सुहासिनी दोशी व मान्यवरांच्या हस्ते नव्या मशिनरीचे उद्घाटन झाले. उपाध्यक्ष सतीश वखारिया यांनी स्वागत केले. प्रा. सुगम चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास मिलिंद मेहता, युगंधर मेहता, राजेश शहा, रितेश शहा, अक्षय दोशी, सुजित स्वामी, जवाहर शहा, सतीश श्रीपन्नावर, सुरज राठोड, प्रतीक शहा, जितेंद्र शहा, सोनू खेडेकर, राहुल कोठारी, प्रशांत बस्तवडेकर, वैभव कंगळे, अक्षय अक्षय पुरंत, संजय शहा, अभिजीत गुरव यांच्यासह मास्क ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करताच महापालिकेची माघार

Spread the love  युवा समितीच्या पाठपुराव्याला यश; फेटाळलेले मतदार नोंदणी अर्ज स्वीकारले बेळगाव : मतदारयादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *