Saturday , October 24 2026
Breaking News

टाऊन प्लॅनिंग कार्यालयाचे कार्यनिवाहक गोविंदसिंग रजपूत यांचा सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील टाऊन प्लॅनिंग कार्यालयाचे नूतन कार्यनिर्वाहक म्हणून गोविंदसिंग रजपूत यांनी पदभार स्वीकारला. त्यानिमित्त टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यापूर्वीच्या कार्यनिर्वाहक विजयालक्ष्मी बाळेहोसूर यांची उच्च शिक्षणामुळे म्हैसूर येथे बदली झाली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून हे पद रिक्त होते. कार्यालयीन कर्मचारी ज्योती पाटील यांनी स्वागत केले. रजपूत यांची यापूर्वी गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर, सिंदगी या ठिकाणी पंचवीस वर्षे शासकीय सेवा झाली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर रजपूत म्हणाले, आपण निपाणी टाऊन प्लॅनिंग कार्यालयात कार्यालयीन अधीक्षक म्हणून काम करत असताना शहराचा मास्टर प्लॅन तयार करण्यासह प्रलंबित कामांना गती दिली जाईल. याशिवाय नागरिकांची कामे वेळेत पार पाडण्याला प्राधान्य नक्कीच देऊ, यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष निकु पाटील यांनी नूतन कार्यवाहक रजपूत यांनी कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांची कामे वेळेवर पार पाडून सर्वांना सहकार्य करण्याचे आव्हान केले. कार्यक्रमास अरुण आवळेकर, ज्ञानेश्वर ढेरे, निलेश येरुडकर, प्रकाश मगदूम, प्रमोद जाधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

म्युनिसिपल हायस्कूलचा फलकच गायब!

Spread the love  शाळेला शतकोत्तर वर्षांची परंपरा ; नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष निपाणी (वार्ता) : निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *