


बुधवारी भर उरूस ; ऊरुस कमिटीची माहिती
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील हजरत पिर बावा ढंगवली व हजरत पिर हैदरशा मदरशा यांचा उरूस सोमवार (ता. २६) ते शुक्रवार (ता. ३०) २०२६ अखेर साजरा होत आहे. बुधवारी (ता.२८) भर उरूस असल्याची माहिती हिंदू मुस्लिम उरूस कमिटीतर्फे देण्यात आले. येथे आयोजित बैठकीत बोलताना उरूस कमिटीचे उमर अफराज म्हणाले, शहरातील नागरिकांच्या सहकार्याने दरवर्षी उरूस साजरा केला जातो. उरूस काळात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याशिवाय नैवेद्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री नऊ वाजता जुनेद सुलतानी (उत्तर प्रदेश) यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. २९ रोजी ऑर्केस्ट्रा धमाका असून ३० रोजी गलेफ मिरवणूक होणार आहे.

कार्यक्रमासाठी सहकाररत्न उत्तम पाटील व अरिहंत संस्थेचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील उर्फ बच्चू पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. उत्तम पाटील यांच्या हस्ते विविध कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. उरूस काळात नगरपंचायतीतर्फे शुद्ध पाणी पुरवठा व स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. दर्गा परिसरात स्वच्छता करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी सदलगा पोलिसांचे सहकार्य लाभणार आहे.
दर्गा परिसरात नेहमीच स्वच्छता राहावी, यासाठी उत्तम पाटील यांनी स्वखर्चातून व नगरपंचायतीच्या विशेष अनुदानातून सीसी रस्ते केले आहेत. सोमवारी ता. २६) रात्री फराशी, मंगळवारी (ता.२७) संदल गंधरात्र व दंडवत कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (ता.२८) भर उरूस आहे. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील असंख्य भाविक उरूसासाठी येत असतात गलेफ चढवितात व देवाकडे मन्नत मागतात. अशा विविधपूर्ण वैशिष्ट असलेल्या बाबा ढंगवली उरुसास सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन उमर अफराज यांनी केले.
यावेळी हिंदू मुस्लिम उरूस कमिटीचे अध्यक्ष सिकंदर अफराज संचालक इम्रान अफराज, अरबाज अफराज तुफान अफराज, इरफान मकानदार, सूरज अफराज, अब्दुल शेख आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta