Monday , October 5 2026
Breaking News

ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या ‘संध्या किरण सेवा केंद्रा’च्या वतीने ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब देसाई, तसेच कार्यवाह सुरेंद्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील, विजय वाईगडे, बाळकृष्ण बिर्जे आणि उल्हास पानसे उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे बाबासाहेब देसाई यांनी ‘मोक्षाच्या सात पायऱ्या व पंचविषय’ या विषयावर मार्गदर्शन करत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.

स्वाती माने यांनी प्रार्थना सादर केली. त्यानंतर नारायण कोरडे, रविंद्रनाथ व स्नेहलता जुवळी, विजय वाईगडे, विजय बांदिवडेकर, सतीश देशपांडे, पांडुरंग कारकल, सुरेश प्रभू, सुरेंद्र देसाई, राजेंद्र व श्रद्धा कर्नाटकी, जगमोहन अगरवाल आणि आर. जी. कुंभोजकर यांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

शिवराज पाटील यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय सुरेंद्र देसाई यांनी करून दिला, तर उल्हास पानसे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपचा बेळगावात एल्गार; काँग्रेस सरकारविरोधात भव्य चाबूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love  बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकारच्या कथित शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत भारतीय जनता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *