Sunday , October 4 2026
Breaking News

ज्येष्ठ नागरिकांसाठी संजीवीनी “उमंग २०२६”चे आयोजन

Spread the love

 

नृत्य-गायनानंतर यंदा विविध खेळांची मेजवानी; संजीवीनी फौंडेशनचा उपक्रम

बेळगाव : ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या आयुष्यात उत्साह, आनंद आणि सकारात्मकता निर्माण व्हावी, तसेच ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येऊन आपले कौशल्य आणि क्रीडागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने संजीविनी फाउंडेशनतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘उमंग’ कार्यक्रमाचे यंदाचे आयोजन रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आले आहे.

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘उमंग २०२६’मध्ये बेळगाव शहर तसेच परिसरातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होता येणार आहे.
यावर्षी कार्यक्रमात विविध इनडोअर व आउटडोअर खेळांसह कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

संजीविनी फाउंडेशनने गेल्या तीन वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘उमंग’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यापूर्वीच्या तीन वर्षांत ज्येष्ठांसाठी नृत्य आणि गायन स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्यातील कलागुण सादर केले. या उपक्रमामुळे ज्येष्ठांना केवळ मनोरंजनाचे व्यासपीठ मिळाले नाही, तर नव्या मित्र-मैत्रिणी जोडण्याची, आपले कौशल्य व्यक्त करण्याची आणि आनंदी वातावरणात वेळ घालवण्याची संधी मिळाली.

यंदा *‘उमंग’* चा विस्तार करत पेंटिंग, क्ले मॉडेलिंग, कॅरम, मेहंदी आणि रांगोळी या कलात्मक व इनडोअर स्पर्धांसोबतच लेमन स्पून, मून वॉक, १०० मीटर धावणे, रिले आणि सॅक रेस अशा विविध खेळांचा समावेश करण्यात आला आहे.

ज्येष्ठत्व म्हणजे केवळ विश्रांतीचे वय नसून अनुभव, उत्साह आणि सुप्त कलागुणांनी समृद्ध जीवनाचा टप्पा आहे, हा संदेश *उमंग* च्या माध्यमातून देण्याचा संजीविनी फाउंडेशनचा प्रयत्न आहे.
साठी नंतरही जीवनात नवा उमंग निर्माण व्हावा आणि ज्येष्ठ नागरिकांनी सक्रिय, आनंदी व उत्साही जीवन जगावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

बेळगाव आणि परिसरातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या कलागुणांना आणि क्रीडाकौशल्याला व्यासपीठ द्यावे, असे आवाहन संजीविनी फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

नोंदणीची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ असून इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.

स्थळ : जी. जी. चिटणीस इंग्लिश मीडियम हायस्कूल, बुधवर पेठ, टिळकवाडी, बेळगाव
दिनांक : ४ ऑक्टोबर २०२६
वेळ : सकाळी ८ वाजता
वयोगट : ६० वर्षे व त्यावरील

नोंदणी व अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा

89049 50603 / 76249 31249

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *