






खानापूर: कर्नाटक सरकारच्या बेळगाव येथील आगामी हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने २ डिसेंबर रोजी ‘महामेळावा’ आयोजित करण्याचे ठरविले आहे. या महामेळाव्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता ‘राजा शिवछत्रपती स्मारक’, खानापूर येथे बोलावण्यात आली आहे.
या बैठकीला समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने व वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील व श्री. निरंजन सरदेसाई आणि सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta