






बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथील विद्यार्थी ध्यानेश बामणे याने कर्नाटक व्ही मिनी स्टेट गेम्स २०२६ या फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे.
युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग तसेच कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ध्यानेशने बेळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन (BDFA) चे प्रतिनिधित्व केले.
अंतिम सामन्यात बेळगाव संघाने म्हैसूर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या संघाचा १-० असा पराभव केला. या विजयात ध्यानेशने मोलाची भूमिका बजावत आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर बेळगावचे नाव उज्ज्वल केले. त्याच्या या कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ध्यानेशच्या या यशाबद्दल शालेय एस.एम.सी. कमिटीचे चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. नितीन घोरपडे, प्राचार्य प्रदीप पाटील आणि उपप्राचार्य मनोहर करडी यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta