Monday , October 5 2026
Breaking News

जायंट्स ग्रुपचा गणेशोत्सव स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : “जायंट्स”ने एक अतिशय चांगला उपक्रम राबविला आहे, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही अनेक दिवस झटून उत्कृष्ट अशा गणेश मूर्ती बनवले आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे विचार सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले यांनी बोलताना व्यक्त केले.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन यांच्या वतीने आयोजिलेल्या ‘उत्कृष्ट गणेश मूर्ती’ आणि ‘उत्कृष्ट देखावा’ या स्पर्धांचा या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. त्या कार्यक्रमास भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी जायंट्सचे अध्यक्ष ऍड लक्ष्मण शिंदे हे होते.
या स्पर्धेत शहरातील एकूण ५६ गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. परीक्षकांनी दिलेल्या निकालानुसार उत्तर आणि दक्षिण अशा दोन विभागांमध्ये विजेत्या मंडळांची निवड करण्यात आली. उत्तर आणि दक्षिण विभागातील प्रत्येकी सहा अशा एकूण १२ मंडळांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या भव्य ट्रॉफीज देऊन सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट सादरीकरण आणि प्रयत्नांसाठी ४ मंडळांना उत्तेजनार्थ ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.
एकूण १४ मंडळांच्या प्रतिनिधींनी आणि इतर सहभागी ५६ मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली होती.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.
या प्रसंगी जायंटस मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी गणेशोत्सव मंडळांना अतिशय मौलिक मार्गदर्शन केले” अतिशय चांगले देखावे सादर केले गेले आहेत, अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारीत असतानाच त्यांनी तशीच शिस्त शेवटपर्यंत ठेवण्याची गरज आहे” असे प्रतिपादन करून या स्पर्धेचे परीक्षण डोळ्यात तेल घालून कशा पद्धतीने केले जाते याची माहिती ही शिंदे यांनी दिली.
फेडरेशन डायरेक्टर शिवकुमार हिरेमठ, फेडरेशन ऑफिसर सुनिल मुतगेकर, कोऑर्डिनेटर अशोक हलगेकर, माजी अध्यक्ष शिवराज पाटील, सुनील भोसले, सचिव विश्वास पवार, उपाध्यक्ष अरुण काळे, मधु बेळगांवकर सह जायंट्सचे बहुसंख्य सदस्य व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू, सचिव पदी डॉ. माधव प्रभू

Spread the love  बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या बेळगाव शाखेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *