Monday , October 5 2026
Breaking News

जिल्हास्तरीय शालेय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित टिळकवाडी येथील सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मुला -मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला रविवारी शानदार प्रारंभ झाला. सदर स्पर्धेत 9 संघांनी भाग घेतला आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर प्रीती कामकर, विनायक कामकर, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, रमेश सिंगद, जी जी चिटणीस स्कूलच्या प्राचार्या नविना शेट्टीगार, हणमंत मास्तीहोळी, ग्रामीणच्या पीईओ साधना बद्री, आय एम पटेल, सुभाष गंभीर, चंद्रशेखर दोडमणी, जयसिंग धनाजी बापू देसाई, प्रवीण पाटील, पी एस एस कुरबेट, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी नविना शेट्टीगार यांच्याहस्ते महापौर प्रीती कामकर त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर आनंद चव्हाण, रमेश सिंगद यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात.
त्यानंतर 17 वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यातील खेळाडूंची प्रमुख पाहुण्यांना ओळख करून देण्यात आली. उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, बापू देसाई, महेश हगीदळी, जयसिंग धनाजी, उमेश मजुकर, मथ्थु लोबो, हर्ष रेडेकर, मानस नाईक, प्रवीण पाटील. संतोष दळवी, प्रसन्ना कुरबेट, आय एम पटेल, सुनिता जाधव, मीनाक्षी जाधव, यस्तराणी आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू, सचिव पदी डॉ. माधव प्रभू

Spread the love  बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या बेळगाव शाखेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *