Monday , October 5 2026
Breaking News

एपीके फाईल पाठवून कंपनी कर्मचाऱ्याला ९९ हजारांचा गंडा

Spread the love

 

मोबाईल हॅक करून बँक खात्यातून रक्कम लंपास; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

बेळगाव : सॉफ्टवेअर अपडेटच्या नावाखाली पाठविण्यात आलेल्या एपीके फाईलच्या माध्यमातून एका खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल ९९ हजार रुपये लंपास करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर सायबर क्राईम विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांबरा येथील चेतन बी. आर. (वय ३३) यांनी यासंदर्भात सायबर क्राईम विभागात फिर्याद नोंदविली आहे. १८ ऑगस्ट रोजी दुपारी मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू असताना त्यांचा मोबाईल सुमारे २० मिनिटे बंद पडला. मोबाईल हँग झाल्याने तो तातडीने सुरू होत नव्हता.

सुमारे २० मिनिटांनंतर मोबाईल सुरू केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ९९ हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एपीके फाईलच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी मोबाईलवर नियंत्रण मिळवून ही रक्कम हडप केल्याचा संशय आहे.

घटनेची माहिती मिळताच चेतन यांनी सायबर क्राईम विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर क्राईम विभागाचे अधिकारी करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू, सचिव पदी डॉ. माधव प्रभू

Spread the love  बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या बेळगाव शाखेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *