Monday , October 5 2026
Breaking News

महात्मा गांधी संस्थेतर्फे निबंध लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न

Spread the love

 

कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. बिजगर्णी हायस्कूल मध्ये या स्पर्धा आयोजित केल्या. अध्यक्षस्थानी निवृत्त क्रीडा शिक्षक के आर भास्कर उपस्थित होते.
इशस्तवन स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली.
महात्मा गांधी फोटो पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक रमेश कांबळे यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

कार्याध्यक्ष पी आर गावडे यांनी प्रास्ताविक करुन राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.
संस्था अध्यक्ष वाय पी नाईक यांनी मान्यवरांचे गुलाब पुष्प, सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले. या स्पर्धा दोन गटात घेण्यात आले.
इ.पाचवी ते सातवी प्राथमिक गटात, प्रथम क्रमांक कु.भूमी
भातकांडे, बालिका आदर्श टिळकवाडी बेळगाव. द्वितीय क्रमांक  अनुष्का स हाजगोळकर, मराठी शाळा, बेनकनहळ्ळी, तृतीय क्रमांक..स्वरांजली सु. मानकोजी, मराठी माॅडेल स्कूल यळ्ळूर, उत्तेजनार्थ.. कु.रोशनी भोसले, प्राथ. शाळा बेनकनहळ्ळी, श्रावणी शशिकांत गावडे, प्राथमिक शाळा कावळेवाडी.
माध्यमिक गटात इ.आठवी ते दहावी, प्रथम क्रमांक नम्रता ल सुतार, बिजगर्णी हायस्कूल.द्वितीय क्रमांक अस्मिता ए खेमनाळकर, माध्यमिक विद्यालय कर्ले. तृतीय क्रमांक समृद्धी प.पाटील,शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी. उत्तेजनार्थ कु.स्नेहा क हलकर्णीकर, बिजगर्णी हायस्कूल. श्रेया य.मोरे, माध्यमिक विद्यालय कर्ले.
विजेत्यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह, गौरव पत्र , गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी निवृत्त मुख्याध्यापक बी बी देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या निबंध लेखनाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महात्मा गांधी संस्था विविध उपक्रम राबवत आहे हे अभिमानास्पद वाटते.सातत्याने अभ्यासाबरोबरच खेळ, आवडता छंद, ग्रंथ वाचन करून आपलं व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे. सातत्याने प्रयत्न करावा. अपयशाने खचून न जाता पुन्हा पुन्हा यशासाठी जिद्द चिकाटीने प्रयत्न करत रहा निबंध विषय हे वैचारिक मंथन करणारे असतात अशा स्पर्धांतून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते असे मौलिक विचार व्यक्त केले.
व्यासपीठावर के आर भास्कर, वाय एन बुरुड, रमेश कांबळे, बी बी देसाई, पी आर गावडे, आल्फीया नावगेकर, एम पी मोरे, लक्ष्मण जाधव, एस एन गावडे, नयन जाधव, परशराम पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
परीक्षक म्हणून सौ.सोनाली कांबळे, शिक्षक के.जी मेणसे, पी आर गावडे यांनी काम पाहिले.
आभार शिक्षिका किरण बा जाधव यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

मटका जुगार अड्ड्यावर काकती पोलिसांचा छापा; एक ताब्यात

Spread the love  बेळगाव : अवैधरीत्या मटका जुगार चालविणाऱ्या अड्ड्यावर काकती पोलिसांनी छापा टाकून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *