Sunday , October 4 2026
Breaking News

नीलगार गणपतीच्या दर्शनासाठी लोटला जनसागर; चेंगराचेंगरीचा प्रकार 

Spread the love

 

संकेश्वर : बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर येथील प्रसिद्ध नीलगार गणपतीच्या दर्शनासाठी रविवारी भक्तांची मोठी गर्दी झाली. सुट्टीचा दिवस असल्याने पहाटेपासूनच हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मात्र, भाविकांची संख्या वाढल्याने दर्शनाच्या रांगेत काही काळ तुफान गर्दी झाली. यावेळी भाविकांमध्ये ढकलाढकली सुरू झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

गर्दीत दोन महिला थोडक्यात बचावल्या

दर्शनाच्या रांगेतील गर्दी वाढल्याने झालेल्या ढकलाढकलीत दोन महिला अडकल्याने त्या तोल जाऊन पडण्याच्या स्थितीत आल्या. त्यामुळे काही क्षणांसाठी चेंगराचेंगरीची भीती निर्माण झाली होती. प्रसंगावधान राखत सहकारी भाविक आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही महिलांना सुरक्षितपणे गर्दीतून बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

पोलिसांची गर्दी नियंत्रणासाठी धावपळ

नीलगार गणपतीची प्रतिष्ठापना दरवर्षी २१ दिवस मोठ्या भक्तिभावाने केली जाते. गणपतीच्या दर्शनासाठी बेळगावसह शेजारील जिल्ह्यांमधून तसेच महाराष्ट्राच्या सीमाभागातूनही मोठ्या संख्येने भाविक येतात.

रविवारी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. दर्शनाची रांग सुरळीत ठेवण्यासाठी तसेच ढकलाढकली रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने उपाययोजना केल्या.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात असून दर्शन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीत घरगुती गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

Spread the love  सलामवाडी, ता. हुक्केरी : दड्डी व परिसरातील घराघरांत विराजमान झालेल्या गणपती बाप्पांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *