





५५ किलो वजन गटातील कबड्डी स्पर्धा; विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धाही
दड्डी (वार्ता) : स्वराज्य बॉईज ग्रुप, शट्टीहळ्ळी यांच्या वतीने भव्य व्याख्यान, सामान्यज्ञान स्पर्धा आणि ५५ किलो वजन गटातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार आणि मंगळवार, दि. ९ व १० नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
सोमवारी सायंकाळी ७ वाजता ‘संत साहित्यामधील समाजप्रबोधन’ या विषयावर प्रा. शिवाजीराव ज. भुकेले यांचे व्याख्यान होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांसह शट्टीहळ्ळी ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी सकाळी ९ वाजता इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास १,५०० रुपये, द्वितीय क्रमांकास १,००० रुपये आणि तृतीय क्रमांकास ७०० रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. विजेत्यांना आकर्षक चषकही प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी शाळेचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.
याच दिवशी दुपारी १२ वाजता ५५ किलो वजन गटातील कबड्डी स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील पारितोषिके पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक : ७,००१ रुपये व ५ फुटी ढाल.
द्वितीय क्रमांक : ५,००१ रुपये व ४ फुटी ढाल.
तृतीय क्रमांक : ३,००१ रुपये व ३ फुटी ढाल.
चतुर्थ क्रमांक : २,००१ रुपये व २ फुटी ढाल.
याशिवाय उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट रेडर यांना विशेष ढाल देऊन गौरविण्यात येणार आहे. कबड्डी स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ४०० रुपये ठेवण्यात आले आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासह युवकांमधील क्रीडागुणांना वाव मिळणार असून, संत साहित्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनालाही चालना मिळणार आहे. परिसरातील विद्यार्थी, युवक, नागरिक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
पंकज पवार : ९१०८८५२५६९, सुशीलकुमार कळविकट्टे : ९०७५६४१५६०, शुभम कळविकट्टे : ९६०६६४८०४१, प्रसाद कुंभार : ८२३७७०७९०८, श्रेयस कुंभार : ७४८३४२८०५५, ओमकार कोकीतकर : ९९७२९५८९३७
Belgaum Varta Belgaum Varta