






बालिका आदर्श कुस्ती संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा; शहापूर येथे दोघींचा सत्कार
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत बालिका आदर्श कुस्ती संकुल केंद्राच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. कु. समिधा भूमेश बिर्जे आणि कु. मनस्वी यल्लाप्पा जायण्णाचे या दोघींनी कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले.
या उल्लेखनीय यशाबद्दल रविवार, दि. ८ रोजी शहापूर येथील सिद्धार्थ फ्री बोर्डिंग येथे दोन्ही महिला कुस्तीपटूंचा सत्कार करण्यात आला.
पीव्हीजी ग्रुपचे नंदकुमार (भाऊ) कंग्राळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी कुस्तीप्रेमी डॉ. गणपत पाटील, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी सर, वस्ताद पै. मारुती गाडी, वैभव (दादा) खाडे, हिरालाल चव्हाण, सुरेंद्र देसाई, संतोष होंगल, परशराम पाटील, महादेव पाटील, निवृत्त क्रीडा अधिकारी विलास घाडी, संजय चौगुले, संतोष कार्लेकर, यल्लाप्पा जयाण्णाचे, राजू बिरजे, भूमेश बिर्जे, नरहरी माळवी आणि प्रभाकर गेरखणी उपस्थित होते.
तसेच सौ. भारती जायण्णाचे, कु. ऋतुजा रावळ, श्रावणी पाटील आदींनीही उपस्थित राहून यशस्वी कुस्तीपटूंचे अभिनंदन केले.
या दोन्ही खेळाडूंनी मिळविलेल्या यशामुळे बालिका आदर्श कुस्ती संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
हिरालाल चव्हाण यांनी आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta