Sunday , November 22 2026
Breaking News

चव्हाण वारसांतर्फे मानकरी लवाजम्यासह दीपावली अभिषेक सोहळा

Spread the love

 

निपाणीतील संत बाबा महाराज चव्हाण दर्गा व समाधीस्थळी धार्मिक विधी

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संत बाबा महाराज चव्हाण दर्गा संस्थानचे प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पीराने पीर दस्तगीर साहेब (क.स्व.) यांचा पारंपरिक दीपावली अभिषेक सोहळा चव्हाण वारसांतर्फे मानकरी व लवाजम्यासह भक्तिभावात पार पडला.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चव्हाणवाडा येथून अभ्यंगस्नान विधीला प्रारंभ झाला. त्यानंतर दर्गा देवस्थानातील तुरबतीस चव्हाण वारसांतर्फे अभिषेक करण्यात आला. पुढे बाहेरील श्री संत बाबा महाराज चव्हाण यांच्या समाधीस्थळी तसेच चव्हाणवाडा येथील मूळ गादीवर अभिषेक घालण्यात आला.

या धार्मिक सोहळ्याला नगरपालिकेचे माजी सभापती बाळासाहेब देसाई-सरकार, संग्राम देसाई, रणजीत देसाई, जयराम मिरजकर, प्रभाकर पाटील, सुजित गायकवाड, संजय माने, संभाजी मुगळे, जयसिंग कांबळे, बाबासो सुतार, शरदचंद्र मळगे, सदाशिव डवरी, अतिश सुतार, सागर हरेल, सचिन पावले, योगेश शहा, शीतल बुडके यांच्यासह साळी समाजबांधव आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारंपरिक धार्मिक विधी आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा दीपावली अभिषेक सोहळा पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

मुलांना मैदानावर पाठवून खिलाडूवृत्ती जोपासा

Spread the love        प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी; बोरगावमध्ये क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *