






निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात रविवारी (ता. ८) आणि सोमवारी (ता.९) असे सलग दोन दिवस धन-संपन्नतेची
देवता लक्ष्मीचे विधीवत पूजन करण्यात आले. व्यापारी बंधूंसह घरोघरी लक्ष्मीपूजनासह दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने सकाळपासून व्यवसायिक आणि घरोघरी नागरिकांची लगबग सुरू होती.
दिवाळीतील सर्वात मोठा धार्मिक विधी म्हणून लक्ष्मी पूजनाकडे पाहिले जाते. पूजनाची तयारी दिवसभर सुरू होती. लक्ष्मी पूजनामुळे उत्साहाला उधाण आले होते. पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. केळीचे खुट, ऊस, खाऊची पाने, फुले, कर्दळी श्रीफळ, प्रसादाचे साहित्याचीखरेदी झाली. दसऱ्यानंतर दिवाळीत फुलांचे भाव चांगलेच वधारले होते. विक्रेत्यांनी आणलेली फुले, ऊस, केळीचे खुट आदींचे भाव ही काहीसे चढेच होते. खरेदीसाठी गर्दी असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचे चित्र होते. दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन
करण्यात आले. मंगळवारी (ता.१०) दिवाळी पाडवा, रोजमेळ पूजन, बलिप्रतिपदा आहे. बुधवारी (ता.११) भाऊबीजने दिवाळीची सांगता होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta