






पारा १६ अंश सेल्सिअसवर ; जनजीवन गारठल्याने कामांच्या वेळात बदल
निपाणी (वार्ता) : निपाणी आणि परिसरात ढगाळ वातावरणामुळे मध्यंतरी काही दिवस गायब झालेल्या थंडीने अपेक्षेप्रमाणे पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या दोन दिवसात निपाणी भागातील थंडीचा पारा घसरला असून ६ अंशावर तापमानाची नोंद झाली आहे. शितल लहरी असल्याने गारठा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यंदाच्या थंडीच्या हंगामातील हे निचांकी तापमान आहे. त्यामुळे नागरिक गारठलेली रात्र आणि पाठ अनुभवत आहेत. निपाणी शहरापेक्षा ग्रामीण भागात तापमानात घसरण होत आहे. कमाल तापमानात घट झाल्याने दिवसा बोचरे वारे वाहात आहेत. याशिवाय सौम्य शितलहरीचे संकेत मिळाल्याने आगामी दिवसांत पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
—————————————————————-
‘यंदाच्या नोव्हेंबर मध्यंतरानंतर थंडीची लाट सुरू झाले आहे. डिसेंबर महिन्यात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. या थंडीमुळे वयोवृद्ध नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. उबदार पोशाख वापरण्यासह पहाटे लवकर उठू नयेत. आवश्यकता भासली तरच मॉर्निंग वॉकला जावे.’
-डॉ. महेश ऐनापुरे, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta