






निपाणी (वार्ता) : सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आर्थिक प्रगतीसह व्यावसाय वाढीच्या क्षेत्रात. बोरगाव येथील श्री. अरिहंत सहकारी पतसंस्थेने स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यामुळे संस्थेला राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित भारतीय सहकारी परिषदेच्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे अरिहंतच्या सहकारी क्षेत्रात सन्मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
सहकारी क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करताना सभासदांचा विश्वास हीच संस्थेची खरी ताकद आहे, असा श्री अरिहंत सहकारी संस्थेचा विश्वास आहे. आर्थिक व्यवहारांमधील शिस्त, नियोजित व्यवस्थापन, ग्राहक-केंद्रित सेवा आणि व्यवसायाच्या वाढीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या माध्यमातून संस्थेने वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे हा गौरव करण्यात आला.
नवी दिल्ली येथे भारत सहकारी संस्थेचे संचालक सतीश मराठे व मान्यवरांच्या हस्ते सहकाररत्न उत्तम पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अजय झा, भारत सरकारचे एमएपीसीबीचे अध्यक्ष लक्ष्मीदास, सहकारी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पंकज बन्सल, सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष डी. के. सिंग, इफ्कोचे माजी व्यवस्थापकीय संचालक यू. एस. अवस्थी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, अरिहंत संस्थेचे संचालक राजू मगदूम, सीईओ अशोक बंकापुरे यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta