Sunday , November 22 2026
Breaking News

निपाणी म्युनिसिपल हायस्कूल ग्रंथालयातील साहित्याच्या मोडतोडसह कागदपत्रे जाळली

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी नगरपालिका प्रशासनातर्फे म्युनिसिपल हायस्कूल शंभर वर्षांपासून सुरू आहे. पण शुक्रवारी (ता.२०) पहाटे काही समाजकंटकांनी ग्रंथालयाचा दरवाजा म्हणून साहित्याची मोडतोड करण्यासह महत्त्वाची कागदपत्रे जाळली आहेत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शहर पोलिसांना तक्रार नोंद केली आहे.
घटनास्थळासह पोलिसांनी दिलेली माहिती अशी, समाजकंटकांनी वर्गातील एका खोलीचा दरवाजा म्हणून आत प्रवेश केला. त्यानंतर ग्रंथालयात जाऊन तिजोरी आणि लाकडी कपाटातील साहित्याची मोडतोड करण्यासह कागदपत्र व इतर साहित्य विस्कटून टाकले आहेत. त्यानंतर काही कागदपत्रे शाळेच्या बाहेर येऊन जाळण्यात आली आहेत. त्यामुळे पहाटे थंडीच्या वेळी ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
शाळेला असलेली संरक्षण भिंत पंधरा वर्षांपूर्वी काढले आहे. मोकार जनावरासह उपद्रवी लोकांचा त्रास सुरू आहे. शिवाय या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेराही बंद केले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने हायस्कूलच्या संरक्षणाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकातून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुलांना मैदानावर पाठवून खिलाडूवृत्ती जोपासा

Spread the love        प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी; बोरगावमध्ये क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *