Sunday , November 22 2026
Breaking News

मानसिक आरोग्य जपणेही तितकेच महत्त्वाचे – ‘ब्रेन, बॅलन्स अँड बाउंडरीज’ विषयावर मार्गदर्शन

Spread the love

 

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि जैन इंजिनिअरिंग कॉलेज, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थी समुपदेशन विभागामार्फत विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘Brains, Balance and Boundaries’ (मेंदू, मानसिक संतुलन आणि वैयक्तिक मर्यादा) या विषयावर मानसिक आरोग्य जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व स्पष्ट करताना भावनिक संतुलन राखणे, तणावाचे योग्य व्यवस्थापन करणे, निरोगी वैयक्तिक मर्यादा निश्चित करणे आणि जीवनातील आव्हानांना सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जाणे याबाबत मार्गदर्शन केले.

संवादात्मक पद्धतीने पार पडलेल्या या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना स्वतःच्या भावना समजून घेणे, मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे आणि निरोगी नातेसंबंध जोपासणे यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

निरोगी मनातून आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीच सशक्त समाजाच्या निर्मितीत योगदान देऊ शकते. त्यामुळे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारे असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *