






दड्डी : सलामवाडी येथून श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने कार्तिक दिंडी भक्तिमय वातावरणात रवाना झाली. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आणि पांडुरंगाच्या नामस्मरणासाठी दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
दिंडीच्या प्रस्थानावेळी गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि विठ्ठलाच्या भजनांनी परिसर दुमदुमून गेला. वारकरी मंडळींनी एकत्र येत विठ्ठल नामाचा गजर केला आणि पंढरपूरच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली.
कार्तिक महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी भाविक मोठ्या श्रद्धेने पंढरपूरची वारी करतात. या दिंडीच्या माध्यमातून भक्ती, श्रद्धा, एकता आणि वारकरी परंपरेचा संदेश दिला जातो. प्रवासादरम्यान भजन, कीर्तन, अभंग आणि हरिनामाच्या माध्यमातून वारकरी आध्यात्मिक आनंद अनुभवणार आहेत.
सलामवाडीतील कार्तिक दिंडी पंढरपूरकडे रवाना झाल्याने गावात उत्साहाचे वातावरण असून, विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या वारकऱ्यांच्या प्रवासाला ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. ‘ज्ञानोबा माऊली, तुकाराम’ आणि ‘पांडुरंग हरी’च्या जयघोषात दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी वारकरी परशराम पाटील, शेवंता पाटील, अंबुबाई बुवा, यशोदा पाटील, कल्लापा पाटील, तानाजी कळवीकट्टे, अक्कूबाई बराटे, अन्नूबाई पाटील, हौशाबाई अस्वले, आदी वारकरी होते.
Belgaum Varta Belgaum Varta