Sunday , November 22 2026
Breaking News

कामगार खात्याचे दीड लाखांचे अनुदान मिळावे

Spread the love

 

लाभार्थ्यांची मागणी : निपाणीत घरकुल लाभार्थ्यांची बैठक

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनारातील सर्वसामान्य नागरिकांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी राजीव गांधी हौसिंग कार्पोरेशन बोर्डाकडून मंजुरी मिळालेल्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना आता कामगार खात्याच्या दीड लाख रुपयांच्या अनुदानापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. घरकुलांचा ताबा देण्याची वेळ आली असताना पूर्वी आश्वासन दिलेले अनुदान मिळणार नसल्याचे सांगण्यात येत असल्याने लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानासह कामगार खात्याचेही दीड लाख रुपयांचे अनुदान मिळवून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील राऊत यांच्यासह लाभार्थींनी यांनी केली आहे
राजीव गांधी हौसिंग कार्पोरेशनकडून घरकुलांना मंजुरी मिळाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांकडून सुरुवातीला प्रत्येकी ६१ हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारकडून एक लाख ५० हजार रुपये, राज्य सरकारकडून एक लाख ८० हजार रुपये आणि कामगार खात्याकडून एक लाख ५० हजार रुपये असे अनुदान मिळवून देण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
मात्र आता घरकुलांचा ताबा देण्याची प्रक्रिया आली असताना कामगार खात्याकडून दिशाभूल केली जात आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या बेघर कुटुंबांनी हक्काच्या घरासाठी पैसे जमा केले असून अनुदानाच्या आशेवर घरकुलाचे स्वप्न पाहिले आहे. त्यामुळे शासनाने केवळ केंद्र व राज्य सरकारचे अनुदान न देता कामगार खात्याच्या अनुदानाचाही लाभ मिळवून द्यावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.यावेळी लाभार्थी महिला आणि नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मुलांना मैदानावर पाठवून खिलाडूवृत्ती जोपासा

Spread the love        प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी; बोरगावमध्ये क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *