






जी. जी. चिटणीस स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा
बेळगाव : “मानवी जीवनात विद्यार्थी जीवनाला अनन्यसाधारण महत्त्व आहेगाव : “मानवी जीवनात विद्यार्थी जीवनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवनाचा पाया भक्कम करण्यासाठी वेळेचा सदुपयोग करा, चांगल्या मूल्यांची कास धरा आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करा,” असे मार्गदर्शन निवृत्त शिक्षक तथा सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष अनंत लाड यांनी केले.
ज्ञानदीप एज्युकेशन ट्रस्ट संचलित जी. जी. चिटणीस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी विमल लाड उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन अॅड. चंद्रहास अणवेकर, उपाध्यक्ष सुधाकर देसाई, इमी राइट्सचे अध्यक्ष प्रा. व्ही. एन. जोशी आणि प्राचार्य डॉ. नवीन शेट्टीगार उपस्थित होते.
प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. नवीन शेट्टीगार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अॅड. चंद्रहास अणवेकर आणि प्राचार्य शेट्टीगार यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना विमल लाड यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
अनंत लाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना न्यूनगंड न बाळगता नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केल्यास निश्चितपणे अपेक्षित यश मिळवता येते, असे सांगितले. विद्यार्थी जीवनाचा आनंद घेत असतानाच ध्येय निश्चित करून मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी अनेक थोर आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनातील प्रेरणादायी उदाहरणेही दिली.
असिफा तोंडी खान आणि सौ. इनशानाज सानुवाले यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष सुधाकर देसाई यांनीही विचार मांडले. यानंतर विद्यार्थ्यांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम झाले.
निशा दोडमणी यांनी आभार मानले, तर भूमी लटकन आणि दिशा दोडमणी यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta