







मालक आणि व्यवस्थापकाला अटक; आरपीडी क्रॉस परिसरातील प्रकार
बेळगाव : शहरातील सलून आणि स्पाच्या नावाखाली कथित वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरपीडी क्रॉस परिसरातील एका सलून अँड स्पावर सीसीबी पोलिसांनी छापा टाकून चार तरुणींची सुटका केली असून, स्पा मालक आणि व्यवस्थापकाला अटक केली आहे.
या ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची माहिती सीसीबी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पीआय मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान परराज्यातील तरुणींना आणून कथित वेश्याव्यवसायात गुंतवले जात असल्याचे समोर आले. गुजरात आणि मुंबई येथील तरुणींसह एकूण चार जणींची पोलिसांनी सुटका केली.
या प्रकरणातील स्पा मालक आणि व्यवस्थापकाला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी प्रकरण टिळकवाडी पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्पा आणि सलूनच्या आडून चालणाऱ्या कथित बेकायदेशीर व्यवसायाबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta