Sunday , November 22 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा फुटबॉल संघ मिनी ऑलिंपिकचा विजेता

Spread the love

 

अंतिम सामन्यात म्हैसूरचा १-० ने पराभव; नवीन पत्कीच्या निर्णायक गोलाने बेळगावला विजेतेपद

बेळगाव : बेळगावच्या फुटबॉलप्रेमींच्या अपेक्षांना साजेसा शानदार विजय मिळवत बेळगाव डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या संघाने कर्नाटक मिनी ऑलिंपिक २०२६ च्या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात बलाढ्य म्हैसूर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या संघाचा १-० गोलने पराभव करून बेळगावच्या संघाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

अंतिम सामन्यात नवीन पत्की याने निर्णायक गोल नोंदवत बेळगावच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या गोलच्या जोरावर बेळगावच्या संघाने प्रतिस्पर्ध्याला मात देत विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली.

या विजयामुळे कर्नाटकाच्या फुटबॉल क्षेत्रात बेळगावने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली असून, शहराच्या फुटबॉल परंपरेला आणखी उजाळा मिळाला आहे. या यशामागे बेळगाव फुटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक मानस सर, खेळाडूंचे पालक आणि समर्थकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

बेळगावच्या फुटबॉल क्षेत्रासाठी हा विजय अभिमानाचा क्षण ठरला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *