Sunday , November 22 2026
Breaking News

चर्मकार समाज बांधवांची बैठक उत्साहात संपन्न; विविध शासकीय योजनांची माहिती

Spread the love

 

बेळगाव : चर्मकार समाजातील गरजू व इच्छुक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने मंगळवार, दि. १७ रोजी समाज बांधवांची बैठक उत्साहात संपन्न झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बैठकीची सुरुवात करण्यात आली. हिरालाल चव्हाण यांनी उपस्थित समाज बांधवांचे स्वागत केले.

बैठकीत समाजातील गरीब व गरजू लाभार्थ्यांनी आपल्या समस्या मांडून उदरनिर्वाहासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली. लिडकरच्या सदस्या सौ. लताताई शिवाजीराव माने आणि संतोष होंगल सर यांनी लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे, निष्ठेने व निःस्वार्थीपणे प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

यावेळी संतोष होंगल यांनी लिडकरच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम योजना, चर्मशिल्प कर्ज योजना, कायक स्मृती योजना, पादुका कुटीर योजना, बाजारपेठ सहाय्य योजना आणि डॉ. बाबू जगजीवनराम कार्यशाळा बांधकाम योजना आदींचा समावेश होता.

बैठकीत सुरेश ताळीकोटी, दीपक तोरे, परसरामभाऊ तोरे, सागर लाटे, मच्छिंद्रनाथ भाऊ कांबळे, बच्चूभाऊ कांबळे सर, राजू अण्णा कांबळे आदींनी आपले विचार मांडले.

बेळगाव शहर, उपनगर तसेच चिक्कोडी, रायबाग, हिरेकुडी, सिंदीकुरबेट आदी भागांतून समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी गणेश काळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *