Sunday , November 22 2026
Breaking News

कावळेवाडीत किल्ल्यांच्या प्रतिकृतींतून इतिहास जागवला

Spread the love

 

कावळेवाडी : दिवाळीच्या निमित्ताने कावळेवाडी येथे लहान मुलांनी ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाचा जागर केला.

श्री दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने गावात किल्ले प्रतिकृती उपक्रम राबविण्यात आला. हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांची आठवण जपण्यासाठी मुलांनी सुमारे ३५ किल्ल्यांचे आकर्षक देखावे उभारले होते. या उपक्रमातून मुलांनी इतिहासाविषयीची आवड आणि सर्जनशीलता दाखवून दिली.

मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाच्या वतीने किल्ले प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीला प्रथम, तर प्रतापगडाच्या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक देण्यात आला. सर्व सहभागी मुलांना गौरवपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी जोतिबा ओऊळकर, हणमंत यळ्ळूरकर, यल्लापा ओऊळकर, पुंडलिक मोरे तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *