Friday , October 23 2026
Breaking News

संकेश्वरजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; कारचालकाचा जागीच मृत्यू

Spread the love

संकेश्वर : तिरुपती येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारने मालवाहू ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील गोटूर (ता. हुक्केरी) गावाच्या हद्दीत सोमवारी (१२ ऑक्टोबर) सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पंकज गोकुळ बाविस्कर (वय ३५, रा. अंबड लिंक रोड, जाधव संकुल, नाशिक) असे मृत युवकाचे नाव आहे.

ट्रकला पाठीमागून जोराची धडक

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने आयशर ट्रक (क्र. एमएच १४/२२०१) जात होता. गोटूरजवळ ट्रकचालकाने अचानक वेग कमी केला. याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने (क्र. एमएच १५/६८०९) ट्रकला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचालक पंकज बाविस्कर यांचा जागीच मृत्यू झाला.

चौघे गंभीर जखमी

या अपघातात कारमधील सतीश बाविस्कर, कल्पेश शिवकर, रोहित देव आणि रोशन हे चौघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने संकेश्वर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

देवदर्शनासाठी आनंदाने प्रवासाला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

ओंकार गणेश मंडळातर्फे होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात

Spread the love  पैठणी साडीची मानकरी सौ. रेखा शिवाजी बुवा दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *