Monday , October 5 2026
Breaking News

ऋषिकेश पाटील यांना अमेरिकेतील विद्यापीठाची पीएचडी

Spread the love

 

बेळगाव : विजयनगर येथील कै. एस. एस. पाटील (सेवानिवृत्त प्राचार्य, न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड) तसेच टिळकवाडी येथील कै. एम. टी. पाटील (सेवानिवृत्त मुख्याध्यापक व आदर्श सोसायटीचे उपाध्यक्ष) यांचे नातू ऋषिकेश प्रमोद पाटील यांना अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट (पीएचडी) पदवी प्रदान केली.

ऋषिकेश यांनी संगणक क्षेत्रातील अत्याधुनिक क्वांटम कॉम्प्युटिंग विषयावर संशोधनात्मक प्रबंध सादर केला. त्यांच्या संशोधनाला डॉ. ज्यो सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

पीएचडी अभ्यासक्रमादरम्यान ऋषिकेश यांची अमेरिकेतील लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी येथे प्रतिष्ठेच्या फेलोशिपसाठी निवड झाली. याच राष्ट्रीय प्रयोगशाळेत ऐतिहासिकदृष्ट्या पहिल्या अणुबॉम्बच्या निर्मितीशी संबंधित संशोधन झाले होते. या फेलोशिपसाठी जगभरातून केवळ २० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

ऋषिकेश पाटील यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक व संशोधनात्मक यशाबद्दल बेळगावसह चंदगड परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मटका जुगार अड्ड्यावर काकती पोलिसांचा छापा; एक ताब्यात

Spread the love  बेळगाव : अवैधरीत्या मटका जुगार चालविणाऱ्या अड्ड्यावर काकती पोलिसांनी छापा टाकून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *