Monday , October 5 2026
Breaking News

सुलभा बुलबुलेंचा गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी पुढाकार

Spread the love

 

बेळगाव : महिला विद्यालय हायस्कूल मराठी व प्रभाताई देशपांडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील माजी कर्मचारी श्रीमती सुलभा वसंत बुलबुले यांनी गरजू व होतकरू विद्यार्थिनींच्या शैक्षणिक मदतीसाठी १ लाख २० हजार रुपयांची देणगी दिली.

या प्रसंगी संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे चेअरपर्सन ॲड. सचिन बिच्चु, व्हाईस चेअरपर्सन डॉ. शोभाताई शानभाग आणि सचिव राहुल फडके उपस्थित होते.

संस्थेच्या व्हाईस चेअरपर्सन डॉ. शोभाताई शानभाग यांच्या हस्ते सुलभा बुलबुले यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सहशिक्षिका अस्मिता देशपांडे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका कविता परमाणिक तसेच सहशिक्षिका दीपा बागेवाडी आणि जया यळगूकर उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू, सचिव पदी डॉ. माधव प्रभू

Spread the love  बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या बेळगाव शाखेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *