Monday , October 5 2026
Breaking News

दगडाने ठेचून महिलेची निर्घृण हत्या; बैलहोंगलजवळ खळबळ

Spread the love

 

बेळगाव : बैलहोंगल शहराच्या बाहेरील अमटूर–नयनगर जोडणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एका महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत महिलेची ओळख लक्ष्मी राजू माडमगेरी (३१), रा. गोल्लर गल्ली, बैलहोंगल अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी महिलेवर दगडाने जीवघेणा हल्ला करून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह जवळील झुडपात फेकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच सीपीआय प्रमोद यलिगार, पीएसआय वाहिद यादवाड यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास व शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

दरम्यान, समाजसेवक मल्लिकार्जुन गाणिगेर यांनी मृतदेह हलविण्यासाठी पोलिसांना मदत केली.

या प्रकरणी बैलहोंगल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हत्येमागील नेमके कारण काय आणि या घटनेत कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू, सचिव पदी डॉ. माधव प्रभू

Spread the love  बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या बेळगाव शाखेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *